जळगावात ड्रायफ्रूटचे दुकान पेटले : लाखो रुपयांचे नुकसान


A dry fruit shop caught fire in Jalgaon : loss of lakhs of rupees जळगाव : दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागल्याने फर्निचरसह एसी व अन्य वस्तू जळाल्याने लाखोंचे नुकसानाझाल्याची घटना शहरातील गणपती नगरातील सुरेश ड्रायफ्रुट दुकानात घडला. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार बंबांद्वारे ही आग विझविण्यात आली. आगीबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

मध्यरात्री लागली आग
बुधवार, 17 मे रोजी मध्यरात्री सुरेश फुड वर्ल्ड दुकानामध्ये आग लागली. आगीत कार्यालयातील एसी तर दुकानातील फर्निचर, कुलर तसेच काही साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापलिका विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे विक्रांत घोडेस्वार, प्रकाश चव्हाण, प्रभाकर सोनवणे, फायरमन निलेश सुर्वे, विलास पाटील, संजय तायडे, मदन जराड, गंगाधर कोळी यांच्याकडून पहाटे चार वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

रामानंद पोलिसांची धाव
घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक प्रवीण भोसले, हर्षल पाटील, पोलीस शिपाई किशोर पाटील हे उपस्थित होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !