धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गृहमंत्री पदक
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. देशभरातील 96 अधिकार्यांमध्ये निरीक्षक हेमंत पाटील यांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील तिखी शिवारातील सामूहिक बलात्कारप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सखोल तपास करीत आरोपींवर कारवाई केली होती. या प्रकरणात खोलवर तपास झाल्याने आठ आरोपींना शिक्षाही झाली होती. शासन नियुक्त समितीने घटना, त्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न आणि तपास आदी बाबी तपासून निरीक्षक हेमंत पाटील यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
देशातील 96 तर राज्यातील 11 अधिकार्यांना पदक
उत्कृष्ट तपासाठी देण्यात येणार्या गृह मंत्री पदकात देशातील 96 तर राज्यातील 11 अधिकार्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून पोलिस अधीक्षक प्रदीप भानुशाली, उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक सुरेश रोकडे, धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, निरीक्षक सागर शिवलीकर, निरीक्षक संजय निकुंबे, निरीक्षक सुधाकर देशमुख, सहा.निरीक्षक सचिन माने, सहा.निरीक्षक श्रद्धा वायदंडे, सहा.निरीक्षक प्रियंका शेळके यांचा समावेश आहे.