अमळनेरात अवैध वाळू तापली : 15 वाहनांवर साडेसात लाखांचा दंड
Illegal sand burning in Amalner : 7.5 lakh fine on 15 vehicles अमळनेर : महसूल विभागातर्फे अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणार्या 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधिताना सात लाख 37 हजार 865 रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आल्यानंतर ही वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली.
या वाहनधारकांविरोधात कारवाई
त्यात गोपाळ किसन पाटील यांचा टेम्पो (क्रमांक एम एच 05 एजी 6381), संदीप जगन्नाथ पारधी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.जे.1402), ट्रॉली (क्रमांक एम.एच.19-5958), राहुल काशीनाथ शिंपी यांचा टेम्पो (क्रमांक एम.एच.02 एच.ए.6265), भूषण दीपक धनगर यांचा टेम्पो (क्रमांक एम.एच.05- 9122), जयेश युवराज पाटील यांचा लाल रंगाचा बिना नंबरचा टेम्पो, ललित कैलास पाटील (एम.एच.01 एल.ए.3033), मुनाफ पठाण यांचे ट्रॅक्टर (एम.एच.19 बी.जी.540), ट्रॉली (क्रमांक एम.एच.19 ई.3423), विश्वास संतोष पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 बी.जी.6402), अकबरखा युसूफखा पठाण यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.21 ए.डी.3785), भैय्या शांताराम पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए.एल.4460), आकाश शिंपी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.ई.1676), धनराज मधुकर पाटील यांचा बिना नंबर टेम्पो, हेमंत राजेंद्र पवार यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.यु.1747), शेख वहाब गफूर यांचा टेम्पो (क्रमांक एम.एच.02 बी.9907), मुकद्दर अली जोहर अली (एम.एच.02 वाय.3481) या वाहनांना अवैध वाळू वाहतूक व गौण खनिज वाहताना तलाठी पथकाने रंगेहाथ पकडून सह वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सर्व वाहनांना एकूण सात लाख 37 हजार 865 रुपयांच्या दंडाची नोटीस दिली असून तीन वाहनांनी दंड भरल्याने त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


