जळगावात दरोड्याचा डाव उधळला : गावठी पिस्टल, काडतूसासह चौकडी जाळ्यात


Robbery plan foiled in Jalgaon: Quartet with village pistol, cartridge in net जळगाव : शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौकडीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस तसेच दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (19, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव), निशांत प्रताप चौधरी (19, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव), पंकज चतूर राठोड (19, तुकारामवाडी, जळगाव) व यश देविदास संकपाळु (19, असोदा रोड, हरीओम नगर, मोहन टॉकीजसमोर, जळगाव) यांना अटक करीत त्यांच्याकडून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस, चाकू, दोर, मिरची पूड व दोन मोटारसायकली जप्त केल्या.

अटकेतील स्वप्नील व निशांतवर प्रत्येकी पाच तर यशवर एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई नाईक हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, दीपक चौधरी, अशपाक शेख आदींच्या पथकाने केली. आरोपींना जळगाव न्यायालयात हजर केले असता 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, योगेश बारी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !