20 हजारांची लाच भोवली : कोपरगाव तहसीलदारांसह पंटर एसीबीच्या जाळ्यात
20 thousand bribe: Kopargaon tehsildar along with punter in ACB’s net
कोपरगाव : वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 20 हजारांची लाच पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना कोपरगाव तहसीलदारांना अटक करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. विजय जबाजी बोरुडे (44, शासकीय निवासस्थान, कोपरगाव, जि.अहमदनगर) व पंटर गुरमीत सिंग दडियल, (40, कोपरगाव, जि.नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
महसूल वर्तुळात खळबळ
33 वर्षीय तक्रारदार यांच्या वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरीता खाजगी पंटराने तहसीलदारांच्या नावाने 17 मे रोजी 20 हजारांची लाच मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी खाजगी पंटराला लाच स्वीकारताच अटक करण्यात आल्यानंतर तहसीलदारांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोली सअधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पंकज पळशीकर, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


