लोण गावातील दाम्पत्य पोटनिवडणुकीत अवघ्या दोन मतांनी विजयी


अमळनेर : अमळनेर तालुक्यातील लोण येथे झालेल्या पोट निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी दाम्पत्य विजयी झाले. सर्वाधिक अल्प मते मिळाल्यानंतरही दाम्पत्य विजयी झाले हेदेखील तितकेच विशेष ! लोण गावातील शहिद जवान लिलाधर शिंदे यांचा दुखवटा म्हणून गावकर्‍यांनी मतदान न करण्याच्या निर्णय घेतला होता.

प्रत्येकी पडले एक-एक मत
लोण खुर्द येथील लिलाधर शिंदे हा जवान शहीद झाल्याने ग्रामस्थांनी आदल्या रात्री बैठक घेऊन दुखवटा म्हणून मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस पाटील आणि इतर दोघे मतदानाला आल्याने एका प्रभागात केवळ तीन मतदान झाले. त्यात हिलाल भटा पाटील व लिलाबाई हिलाल पाटील हे दोघे पती-पत्नी असलेल्या उमेदवार दोन-दोन मते मिळाल्याने विजयी झाले तर एक मत नोटाला पडले. एका प्रभागात शून्य मतदान झाल्याने त्या प्रभागातील जागा पुन्हा रीक्त राहिली आहे.

लोणसीमला जागा रीक्तच
लोणसीम या गावाला देखील अनुसूचित जमाती प्रवर्गात उमेदवार न मिळाल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही. तेथील जागा रीक्त राहिली आहे. लोणसीम या गावाला देखील अनुसूचित जमातीचा एकही अर्ज न आल्याने तेथेही जागा रीक्त राहिली आहे.

दरम्यान मुंगसे येथे प्रभाग दोन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गात अल्काबाई कैलास भिल व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गात आशाबाई रामचंद्र कोळी या बिनवोरोध निवडून आल्या आहेत. वावडे येथे प्रभाग 1 मध्ये स्वाती वाल्मिक ठाकरे (ना मा प्र स्त्री) , खडके येथे प्रभाग तीन मध्ये कविता सचिन पाटील (सर्वसाधारण स्त्री) , ढेकू खुर्द प्रभाग तीन वैशाली नथु सोनवणे (सर्वसाधारण स्त्री) , नगाव खुर्द प्रभाग 1 देवदत्त गरबड सोनवणे (अनुसूचित जाती) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, तलाठी पी.एस.सोनवणे, तलाठी वाल्मिक पाटील व नितीन ढोकने यांनी मतदान व मतमोजणीसाठी सहकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !