गावठी कट्टा व पाच तलवारींसह कंडारीतील मावसभाऊ एलसीबीच्या जाळ्यात
शस्त्र तस्करी पुन्हा ऐरणीवर : हतनूर धरण परीसरात झाली कारवाई
Gavathi Katta and five swords in the net of Mavsabhau LCB in Kandari भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील दोघा मावस भावांना गावठी कट्टा, जिवंत काडतूस व पाच तलवारी बाळगताना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हतनूर धरण परीसरातील अंजलसोडे रस्त्यावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी वरगणाव पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर नारायण मोरे (26) व कल्पेश राजू मोरे (22, दोन्ही रा.ग्रामपंचायत समोर, कोळीवाडा, कंडारी, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत
गोपनीय माहितीवरून कारवाई
कंडारी येथील दोघा मावस भावांकडे गावठी कट्ट्यासह तलवारी असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मयूर नारायण मोरे (26) व कल्पेश राजू मोरे (22, दोन्ही रा.ग्रामपंचायत समोर, कोळीवाडा, कंडारी, ता.भुसावळ) यांना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेत बोलते केल्यानंतर त्यांनी हतनूर धरणाजवळील अंजनसोंडे रस्त्यावर लपवलेल्या पाच तलवारींसह गावठी कट्टे व एक जिवंत काडतूस पथकाला काढून दिले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, एएसआय अनिल जाधव, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार अनिल देशमुख, हवालदार दीपक पाटील, हवालदार महेश महाजन, नाईक कृष्णा देशमुख, नाईक ईश्वर पाटील, चालक महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात दोघा युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
