मुडी प्र.डांगरीतील प्रौढाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू


Mudi Q. An adult in Dangri died after being hit by a bike अमळनेर : रस्त्याने पायी चालणार्‍या अमळनेर तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथील 47 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वास बडगुजर (47) असे मयताचे नाव आहे.

दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
28 एप्रिल रोजी गावातील गायमाता मंदिर परीसरात विश्वास बडगुजर हे सायंकाळी पायी फिरत असतांना दुचाकी (एम.एच.19-0527) वरील अनोळखी चालकाने त्यांना पाठी मागून धडक दिल्याने ते जखमी झाल्यानंतर त्यांना अमळनेर येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालवल्याने धुळे येथे हलवले असता त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी सुरेखा बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुडी प्र.डांगरी येथील संशयित दुचाकीचालक नईम इमाम पिंजारी याच्याविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !