शेतात ट्रॅक्टर उलटल्याने कावपिंप्रीच्या तरुणाचा मृत्यू


अमळनेर : तालुक्यातील कावपिंप्री येथील तरुण शेतात ट्रॅक्टरने मशागत करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वजाता घडली. सतीश निंबा पाटील (36, रा.कावपिंप्री, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे.

नाल्यात ट्रॅक्टर कोसळले
सतीश हा शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करीत असतांना शेताच्या बांधाला लागून असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सतीश पाटील मजुरीचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील मुलगा, मुलगी आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !