जळगावसह भुसावळात पोलिसांची धडक कारवाई : आठ संशयित चार कट्टे व पाच तलवारींसह जाळ्यात

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची पत्रकार परीषदेत माहिती


Police raid in Bhusawal along with Jalgaon: Eight suspects in the net with four knives and five swords जळगाव : जिल्हा पोलीस दलाने एमआयडीसीसह भुसावळ व अडावद येथे केलेल्या कारवाई चार गावठी कट्ट्यांसह पाच तलवारी व दोन चॉपर, चाकूसह आठ संशयितांच्या मुसक्या बांधल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेला भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, परीविक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक गणेश बुवा आदी उपस्थित होते.

अशी झाली कारवाई
एमआयडीसी हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक करण्यात आली. स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर (19), निशांत प्रताप चौधरी (19, दोन्ही रा.शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (19, रा.तुकारामवाडी, जळगाव), यश देवीदास शंकपाळ (19, हरीओम नगर, आसोदा रोड) यांना अटक करण्यात आली. दरोड्याच्या साहित्यासह पिस्टल, तीनजिवंत काडतुस, दोन मोटार सायकली आदी साहित्य जप्त करण्यात आले.

भुसावळात कट्टा जप्त
भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परीसरातून ललित तुलसीदास खरारे (22), जितेंद्र आनंद बोयत (23) व पवन किसन खरारे (27, सर्व रा.वाल्मीक नगर, भुसावळ) या आरोपीकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कंडारीतून तलवारी जप्त
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडील गावठी पिस्तूल, पाच तलवारी, एक काडतूस जप्त करण्यात आले.

अडावद येथे गावठी कट्टा जप्त
अडावद येथे तरुण गावठी कट्टा तस्करी करणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रवींद्र पाटील, दीपक शिंदे यांना मिळाली होती. पथकाने लागलीच धाव घेत बस (क्रमांक एमएच.20.बीएल.2277) मधील रमेश घुमरसिंग भिलाला याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !