जळगावात ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळले : चालकाचा मृत्यू


जळगाव : भरधाव ट्रॅक्टर रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे चालक विनोद महारू मालचे (40, रा़ मोहाडी) याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली़ सोमवारी सकाळी वाळू भरल्यानंतर ट्रॅक्टर घेवून विनोद मालचे हा चालक नागझिरी शिवाराकडून मोहाडी गावाच्या दिशेने भरधाव निघाला असता मोहाडी गावाजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी मोठ-मोठे खड्डे खोदण्यात आल्याने खड्ड्याजवळ ट्रॅक्टरचे ब्रेक लागले व अन् ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्षणात त्या आठ ते दहा फुट खोल खड्डयात कोसळले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !