विवाहित पुरूषासोबत राहण्याचा हट्ट : 40 वर्षीय महिलेचा हिंगोणा शिवारात खून ; आरोपीला अटक


Insistence on staying with a married man : 40-year-old woman killed in Hingona Shivar ; The accused was arrested फैजपूर : विवाहित पुरूषासोबत राहण्याचा हट्ट केल्याने 40 वर्षीय महिलेच्या गळ्यावर ब्लेड मारून व तिला विहिरीत ढकलण्यात आल्याने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात संशयित खुमसिंग सरदार बारेला (33, मूळ रा.खिरवड, ता.रावेर, ह.मु.मोर धरणाजवळ, हिंगोणा, ता.यावल) या संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली.

अखेर आरोपीची पटली ओळख
सूत्रांच्या माहितीनुसार, 40 वर्षीय महिला संशयीताकडे घरी आली व त्यावेळी महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तु तुझ्या घरी निघून जा, तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे त्याने तिला म्हटले होते मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयिताने त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले व नंतर तिला विहिरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !