निंबोलच्या रहिवाशांची रावेर तहसीलवर धडक
रावेर : पुनर्वसन भूखंडावर गावातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने पैसे भरूनही भूखंड मिळत नसल्याने संतप्त झालेल्या निंबोलच्या नागरीकांनी तहसील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. निंबोलच्या 40 भूमिहीन शेतमजुरांचे नाव पुनर्वसन समितीच्या यादीत नसल्याने त्यांना भूखंड मिळाले नाही मात्र या नागरीकांना गावठाणच्या गट 11 ,12 व 13 मध्ये मागणी केल्यानंतर 2011 मध्ये पुनर्वसन अधिकारी यांनी भूखंड देण्याचे मान्य केले. यासाठी 30 नागरीकांनी भूखंड मिळण्यासाठी कब्जे हक्कासाठी मोजणी फी म्हणून 2014 मध्ये चलनाद्वारे 30 हजार रुपये शासनाकडे भरलेले आहेत मात्र सहा वर्षे उलटूनही या भूखंडावर काही जणांच्या अतिक्रमणामुळे भूखंड मिळाले नसल्याने संतप्त नागरीकांनी तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी एका बैठकीसाठी उपस्थित असलेल्या प्रभारी प्रांताधिकारी यांच्याकडे या नागरीकांनी हा प्रश्न आक्रमकपणे मांडला. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, सहायक गटविकास अधिकारी हबीब तडवी, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे उपस्थित होते.
