अ‍ॅपेच्या धडकेने दाभाडीच्या तरुणाचा मृत्यू : अ‍ॅपे चालकाविरोधात गुन्हा


Death of Dabhadi youth due to collision with App : Crime against App driver जळगाव : अ‍ॅपे रीक्षाच्या धडकेने दाभाडी, ता.जामनेर येथे तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अ‍ॅपे चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात अ‍ॅपे चालकाचा शोध सुरू
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलावरून अनिल संजय सपकाळे (रा.साकेगाव) व अमोल आनंदा सपकाळे (20, रा.दाभाडी, ता.जामनेर) हे दोघे शुक्रवार, 19 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ येथून कपडे खरेदी करून जळगाव तालुक्यातील बेळी येथे परत जाण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 डी.जे.993) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना रेल्वे उड्डाण पुलावरून जात असताना समोरून येणारी अज्ञात अ‍ॅपेने जोरदार धडक दिली. या धडके दोघे जण डिव्हायडरवर पडले. या अपघातात अमोल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अनिल सपकाळे हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अनिल सपकाळे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार घेतल्यानंतर संजय सपकाळे यांनी सोमवार, 29 मे रोजी सायंकाळी सात वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.


कॉपी करू नका.