भुसावळातील पोस्ट कार्यालयाच्या आवारातून दुचाकी लांबवली

0

भुसावळ : शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या आवारात असलेल्या वाहन पार्कीगमध्ये लावलेली हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल (यु.पी.81 वाय.7528) ही अज्ञात चोरट्याने 30 एप्रिल 2024 या दिवशी सकाळी 9.37 ते संध्याकाळी 6.30 याकाळात चोरून नेली.

याप्रकरणी सोमवार, 6 मे या दिवशी बाजारपेठ पोलिसात संजय सारस्वत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.