रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध : खासदार रक्षाताई खडसे

भुसावळ तालुक्यात प्रचार दौरा : मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत

0

भुसावळ : गेल्या दहा वर्षांच्या कामात अनेक विकासकामे करण्यात आली असून यापुढील काळात विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही खासदार रक्षताई खडसे यांनी दिली. रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील मौजे वराडसीम, बेलव्हाय, सुनसगाव आदी भागात बुधवारी प्रचार दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह भुसावळ तालुक्यातील मौजे वराडसीम, बेलव्हाय, सूनसगाव आदी गावात प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.