मोठ्या साहेबांची मोठी घोषणा : सुप्रिया सुळेंसह प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष


Supriya Sule along with Praful Patel NCP Working President मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा करीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद दिले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार? यावरून बरीच चर्चा झाली मात्र आता पवारांच्या घोषणेनंतर उत्तराधिकार्‍यांचीच घोषणा झाल्याचे बोलले जात आहे.

आता अधिक जोमाने कामाला लागण्याची गरज
24 वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. यानंतर त्यांनी भाषण थांबविले परंतू पुन्हा बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीतील जबाबदार्‍यांची घोषणा करून टाकली आहे.

नव्या नेत्यांना दिली ही जवाबदारी
प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा अदी राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंना देखील पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरीयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !