जळगावात तरुणाला मारहाण करून लुटले : चौघांविरोधात गुन्हा
Kalyan’s youth was beaten and robbed in Jalgaon जळगाव : कल्याण येथील तरुण कामानिमित्त शहरात आल्यानंतर त्यास मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बॉम्बे बेकरीनजीक शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञातांचा पोलिसांकडून कसून शोध
यशवंत विठ्ठल भगत (30, रा.मांजरली, बावली, कल्याण) हा तरुण कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बॉम्बे बेकरीनजीक शनिवार, 10 जून रात्री 11.30 वाजता अज्ञात चार जणांनी रस्ता अडवत त्याच्याजवळील मोबाईल जबरीने हिसकावून दुचाकीने पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर रविवार, 11 जून रोजी दुपारी पावणेतीन वाजता यशवंत भगत याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे


