दोन भरधाव दुचाकींमध्ये अपघात : गारखेड्यातील प्रौढ जागीच ठार
Accident between two high-speed bikes : Garkheda adult killed on the spot रावेर : भरधाव दुचाकीने विरुद्ध दिशेने येवून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गारखेडा येथील 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात रावेर-भाटखेडा रस्त्यावरील वीट भट्टीजवळ शनिवार, 10 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार विनोद गोविंद गाढे (45, गारखेडा, ता.रावेर) यांचा मृत्यू झाला.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
अजबराव एकनाथ गाढे (33, विवरे खुर्द) यांच्या तक्रारीनुसार, विनोद गाढे हे दुचाकी (एम.एच.19 डी.पी.1799) वरून रावेरहून गारखेडा निघाले असताना संशयित चालक कैलास भावराव तायडे (रावेर) याने दुचाकी (एम.एच.19 बी.पी.7671) ही भरधाव वेगात चालवून व विरुद्ध बाजूने येवून धडक दिल्याने गाढे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित चालक कैलास तायडे हा खबर न देता पसार झाल्याने त्याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.
