एरंडोलमध्ये एसीबीची सर्वात मोठी कारवाई : शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघे जाळ्यात
ACB’s biggest action in Erandole : Three arrested including chairman of education institute एरंडोल : एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसर्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्या एरंडोल शहरातील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक व वरीष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सरस्वतीच्या ज्ञान मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारी उशिरापर्यंत संबंधितांनी लाच प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अटकेतील संशयितांमध्ये मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (42), वरीष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (44) व श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (56) यांचा समावेश आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, ईश्वर जाधव, सचिन चाटे, रवींद्र घुगे, सुनील पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


