शेतात काम करीत असताना विषारी सर्पाच्या दंशाने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू : भडगाव तालुक्यातील घटना


A farmer from Valwadi died of snakebite भडगाव :  भडगाव तालुक्यातील वलवाडी येथील शेतकरी एलजी हिरामण सोनवणे (47) यांचा शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली.

विषारी सर्पाच्या दंशाने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू
शेतकरी पाटील हे शेतात कामासाठी गेले असता शेतातील विहिरीजवळत्यांना विषारी सर्पाने दंश केला. यावेळी आजू-बाजूच्या शेतकर्‍यांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आहे. तपास पोलीस नाईक मनोज माळी करीत आहेत. मयत एलजी सोनवणे हे वलवाडीचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे भडगाव तालुकाध्यक्ष अरुण सोनवणे यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !