डांभूर्णी शेत-शिवारात अज्ञात इसमाकडून विद्युत तार तोडून 35 हजारांचे नुकसान


35,000 damage caused by breaking electric wires in Dambhurni Farm-Shiwar by an unknown person यावल : तालुक्यातील डांभूर्णी शेत-शिवारामध्ये अज्ञात इसमाने राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील तार तोडून फेकून दिल्याने विद्युत वितरण कंपनीचे सुमारे 35 हजारांचे नुकसान झाले तर शेत परीसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
डांभूर्णी, ता.यावल शेतशिवारात हेमराज चांगदेव चौधरी यांच्या शेतात राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब आहे. या खांबावरील विद्युत तार कोणीतरी तोडून टाकल्याच्या बुधवारी सकाळी निदर्शनास आला. हा प्रकार शेतकर्‍यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांना सांगितल्यानंतर त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता हेमराज चांगदेव चौधरी व उल्हास रघुनाथ कोल्हे यांच्या शेतापर्यंत संपूर्ण विद्युत तार अज्ञात इसमाने तोडून विद्युत वितरण कंपनीचे तब्बल 35 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले. सोबत या भागातील वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे. या प्रकरणी इकबाल हसन तडवी यांनी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !