अमळनेरातील पूजार्‍याच्या डंपरच्या धडकेने मृत्यू


A priest in Amalner died after being hit by a dumper अमळनेर : अमळनेर शहरातील शनी मंदिरावरील पुजार्‍याचा डंपरच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 14 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडला. अपघात प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात शनी मंदिराचे पूजारी मनोज वासुदेव उपासनी (47) यांचा मृत्यू ओढवला.

डंपरच्या धडकेने जागीच मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, पूजारी उपासनी हे दुचाकी (एम.एच.03 बी.जी.0912) बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना पाठीमागून आलेला भरधाव डंपर (एम.एच.11 ए.एल.5783) ने धडक दिल्याने उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकून ते सुमारे 60 मीटरपर्यंत फरफत् गेले व पुलावरील फुटपाथच्या दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आशुतोष प्रसाद उपासनी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून डंपर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !