शतपावली करणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले ; चाळीसगावात खळबळ


Dhoom style gold chain extended in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील भडगाव रोडवर असणार्‍या अंधशाळेजवळ शतपावली करणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध
चाळीसगावातील आई हॉस्पिटलशेजारी असणार्‍या बाप्पा पॉईंट जवळ राहणार्‍या रीटा भूपेंद्र मेहता (57) या घरकाम करतात. त्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गीता दिनेशभाई पटेल यांच्या सोबत निघाल्यानंतर अंधशाळेजवळ अज्ञात दोघे भामटे दुचाकीवर आले व त्यांनी रीटा मेहता यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची सोन्याची चैन बळजबरी काढून घेत पोबारा केला. महिलेने आरडा-ओरडा केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश बेलदार करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !