पाचोर्‍यातील जीन ऑटोमधून सव्वा लाखांची रोकड लांबवली : कर्मचार्‍यांवर संशय


A quarter of a lakh cash was withdrawn from Jean Auto in Pachora: Suspicion on the employees पाचोरा : शहरातील जीन ऑटो शोरूममधून एक लाख 17 हजारांची रोकड लांबवण्यात आल्याची शनिवार, 10 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी शोरूममध्ये काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्मचार्‍यांवर व्यक्त केला संशय
बिपीन रामेश्वर निमोदीया (52, पाचोरा) यांचे शहरात जीन ऑटो नावाचे होंडा व सुझूकी गाड्यांचे शोरूम आहे. या शोरूममधून एक लाख 17 हजारांची रोकड चोरीला गेल्याची बाब शनिवार, 10 रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक दरम्यान घडली. ही चोरी कर्मचारी शैलेश रघुनाथ नेवे (पाचोरा) व पंकज सुनील पाटील (कृष्णापुरी, पाचोरा) यांनी केल्याचा संशय निमोदीया यांनी व्यक्त केला असून त्या आशयाची तक्रार पाचोरा पोलिसात दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान चौधरी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !