अमळनेरात धाडसी घरफोडी : 64 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary in Amalner : 64 thousand instead of loot अमळनेर : शहरातील ढेकू रोडवरील नारायणवाडी भागातील नोकरदाराचे बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी 64 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला टार्गेट
ढेकू रोडवरील नारायणवाडी भागात प्लॅट क्रमांक एकमध्ये राजेंद्र शांताराम शिंदे (46) हे नोकरदार कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 8 ते 9 जूनदरम्यान शिंदे कुटूंब बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत फ्रेंच दरवाजाची काच तोडून घरात प्रवेश करीत 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, चार हजारांचे चांदीचे दागिने तसेच पाच हजार रुपये किंमतीचे टायटन कंपनीचे मनगडी घड्याळ असा एकूण 64 हजारांचा ऐवज लांबवला. शिंदे घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी अमळनेर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !