मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार : चाळीसगावातील घटना
Chalisgaon girl raped with the lure of marriage चाळीसगाव : शहराला लागून असलेल्या एका भागातील 20 वर्षीय तरुणीवर सुरूवातीला लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला व त्याचे फोटो काढून व्हिडिओ तयार करण्यात आले व नंतर या व्हिडिओचा आधार घेत संशयिताने व्हिडिओ व्हायरल करून बदनामी देण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार (चाळीसगाव तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
शहरापासून काही अंतरावर 20 वर्षीय पीडीता परीवारासह वास्तव्यास असून संशयित व पीडीतेत ओळख निर्माण झाल्यानंतर संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला व त्याबाबत फोटो काढून व्हिडिओ चित्रीकरण केले व नंतर मी बोलावल्यानंतर तु आली नाही तर हे व्हिडिओ व फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तरुणीला शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली व लग्न करणार नाही, असेदेखील आरोपीने सांगितल्याने फसवणुकीची खात्री होताच तरुणीने पोलिसात तक्रार नोंदवली. ही घटना जून 2019 ते 13 मार्च 2023 दरम्यान वेळोवेळी घडली. तपास सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.


