नांद्रा गावातील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या


Suicide of a smallholder farmer in Nandra village पाचोरा : आर्थिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावातील अल्पभूधारक शेतकरी दिलीप हरी बोरसे (42) यांनी गुरुवार, 15 जुन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जंगलातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी आणला मुलाचा निकाल अन् नंतर केली आत्महत्या
गव्हाई शिवारातील शशिकांत बोरसे व नथ्थू सुकदेव यांच्या सामाईक बांधावरील निबांच्या झाडाला कोणीतरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती येथील शेतकरी राजू तावडे यांनी ग्रामस्थांना दिली. उन्हाळी कापसाची वखरणी करून राजू तावडे हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. घटनेप्रकरणी पोलीस पाटील किरण तावडे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप बोरसे यांच्या मुलीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून मुलगा दहावी पास झाल्याने त्याच्या पुढील शिक्षणाची चिंता तसेच अन्य आर्थिक कारणातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दिलीप बोरसे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !