जळगावातून चोरट्यांनी महागडी इनोव्हा लांबवली


Innova parked in open space stolen: Gang active in Jalgaon जळगाव : दुचाकी चोरट्यांनी जळगावात डेरा जमवला असतानाच आता महागड्या चारचाकी गाड्या लांबवण्याचे सत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. एमआयडीसी हद्दीतील रामचंद्र नगर, अयोध्या नगर भागातील मोकळ्या जागेतून चोरट्यांनी चार लाख 20 हजार रुपये किंमतीची महागडी इनोव्हा लांबवल्याची बाब उघडकीस आल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केली चोरी
पराग चंद्रकांत पाटील (30, ग्रामपंचायतजवळ, असोदा, ता.जळगाव) हे किरााणा व्यावसायीक असून त्यांच्याकडे वापरासाठी इनोव्हा (एम.एच.19 बी.यु.0500) आहे. पाटील यांनी आपली चारचाकी मामा कृष्णा भगवान शिंदे यांच्या रामचंद्र नगर, लिला पार्क, जान्हवी हॉटेलसमोरील अयोध्या नगरातील मोकळ्या जागेत पार्क केली होती. बुधवार, 14 रोजी पहाटे वाहन जागेवर नसल्याने शिंदे यांनी पाटील यांना कळवल्यानंतर त्यांनी खातरजमा केली असता वाहनाची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विकास सातदिवे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !