ममुराबादच्या वीटभट्टी चालकाची विहिरीत उडी घेत आत्महत्या


A brick kiln operator of Mamurabad committed suicide by jumping into a well जळगाव : ममुराबाद येथील वीटभट्टी चालकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 15 जून रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. समाधान भास्कर कुंभार (38) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

सहा तासानंतर आढळला मृतदेह
समाधान कुंभार यांनी मृत्यू पूर्वी आपल्या मुलास आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली असल्याचे जळगाव तालुका पोलिसात दिलेल्या खबरीत मयताचे बंधू कैलास कुंभार (35) यांनी म्हटले आहे. समाधान कुंभार हे ममुराबाद शिवारात वीटभट्टी चालवून व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी असा परीवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे विकास शिंदे, माणिक सपकाळे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी गावातील पट्टीच्या पोहणार्‍यांना आणले. त्यानंतर विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला मात्र विहिरीत पाणी भरपूर असल्याने सहा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह हाती आला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रात्री उशीरा समाधान कुंभार यांच्यावर ममुराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !