जाहिरातबाजांच्या हाती राज्याची सत्ता : अमळनेरात अजित पवारांनी चालवले टिकेचे बिाण
Power of the state in the hands of advertisers : Ajit Pawar ran the seeds of ticks in Amalner अमळनेर : राज्यातील सरकार सत्तेसाठी लाचार असून हे सरकार जाहिरातीचे सरकार आहे, अशी कणखर टिका महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी येथे केली. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी सरकारवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, राज्यातील सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा ही जणू काही स्पर्धा सुरू झाली. शिंदे सरकारने देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात देत फडणवीसांना कमी लेखले मात्र नंतर त्याचे पडसाद उमटताच दुसर्यांदा जाहिरात देण्यात आली मात्र त्या जाहिरातीत शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे फोटो टाकण्यात आले व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असून हे सरकार अजूनही त्यांना पाठीशी घालत असल्याने राज्यात केवळ जाहिरातीचे सरकार सत्तेसाठी लाचार झाल्याचे ते म्हणाले.
कांदा, कापूस उत्पादकांची निराशा
सध्याचे सरकार केवळ प्रशासनातील अधिकार्यांच्या बदली करीत असल्याने त्यामुळे चांगल्या अधिकार्यांना याचा फटका बसला आहे. सध्या बेरोजगारी आणि महागाईने जनता त्रस्त आहे. अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले, कांदा व कापूस उत्पादकांची घोर निराशा झाली आहे. महाराष्टात कमी भावाने कांदा खरेदी करून हैद्राबादला जादा भावाने विक्री केला जात आहे. सगळ्यात मोठा प्रश्न कापूस भावाचा आहे, आमच्या सरकारने कापसाला योग्य तो भाव दिला होता मात्र यावेळच्या सरकारने कापुस उत्पादक शेतकर्याचा थोडाही विचार केलेला नाही. शेतकर्यांना वेळेवर ट्रान्सफारर्मर मिळत नाही. सध्या महाराष्ट्रात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करून दंगली निर्माण होत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा दरारा राहिलेला नाही शिवाय शासनाचा हस्तक्षेप वाढला आहे. सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आले आहे, अशी कणखर टिका त्यांनी केली.

त्या दोन हजारांच्या नोटा गेल्या कुठे ?
सरकारने जाहिरातीवर करोडो रुपये ओतले आहेत. पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप असूनही कारवाई होत नाही. दोन हजार रुपयाची नोट बंद करून त्या नोटा आरबीआयकडे आल्या नसल्याने या नोटा गेल्या कुठे? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. चांगल्या कामासाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही सहन करायला तयार आहोत. पण आता सहनशीलता संपली आहे., मागे किती काळापैसा बाहेर आला ते सांगा, सरकारकडे त्याचे उत्तर नाही.
जागा वाटपाचे गणित सामोपचाराले सोडवणार
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात वाद होणार नसल्याची काळजी घेतली जाईल शिवाय सामोचाराने प्रश्न सोडवले जातील. ज्या पक्षाची ताकद जिथे असेल तिथे त्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल त्यामुळे सध्या मीडियामध्ये उलट सुलट बातम्या असल्याने त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.
