एरंडोलला दशमाता मंदिर फोडले : तीन लाखांचा ऐवज लंपास
Erandola Dasmata temple destroyed: three lakhs instead of lumpas एरंडोल : शहरापासून काही अंतरावरील नागदुली शिवारातील दशमाता मंदिराची भिंत फोडून देवीच्या अंगावरील दागिन्यासह दानपेटीतील रोकड मिळून दोन 95 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबल्याची धक्कादायक घटना 15 ते 16 जूनदरम्यान घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भिंत फोडून केली चोरी
एरंडोल शिवारातील नागदुली शिवारात बारा ज्योर्तिलिंग आणि दशमातेचे मंदिर आहे. गुरुवार, 15 जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दशमाता मंदिराची भिंत फोडून आत प्रवेश करत देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून त्यातील रोकडसह दोन लाख 95 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही चोरी शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मंदिराचे पूजारी विलास महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा केला. पूजारी विलास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


