चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले
A minor girl from Chalisgaon taluka was seduced and abductedचाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवले. याबाबत शुक्रवारी दुपारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी 19 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेच्या सायगाव येथे कामासाठी गेली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. पीडीतेच्या आजीने मुलीचा सर्वत्र सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही न आढळल्याने शुक्रवार, 16 जून रोजी दुपारी एक वाजता पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर मेहुणबारे पोलिसात भादंवि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे


