बोरींगचा पाईप बाहेर लावण्यावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ


जळगाव : सामाईक बोरींगचा पाईप कम्पाऊंडच्या बाहेर लावण्याच्या कारणावरून हरीविठ्ठल नगरातील महादेव मंदीराजवळील एका महिलेला दोन जणांनी अश्लिल शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुरूवारी दुपारी दोन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पुतलाबाई रमेश पवार (50, महादेव मंदीराजवळ हरीविठ्ठल नगर, जळगाव) या वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाजूला राहत असलेल्या संगीता कैलास निकम आणि कैलास निकम यांनी गुरुवार, 8 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सामाईक बोरींगचे पाईप कम्पाऊंडच्या बाहेर लावण्याच्या कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ केली तसेच दोघांनी महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आठवडाभरानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !