अवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल


Illegal sand mafia’s properties will be burdened : Collector Amal Mittal जळगाव :  जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून आठवडाभरात सुमारे 25 हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी दंड न भरल्यास संबंधिताच्या मालमत्तांवर बोजे बसवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परीषदेत दिली.

वाळू वाहतुकीवर लावणार अंकुश
ते म्हणाले की, गत आठवड्यात महसूल प्रशासनातील अधिकार्‍यावर वाळू माफियांनी रावेर तालुक्यात हल्ला केला होता. यापुढे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच वाळू माफियांवर अंकुश लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील तसेच वाळू माफियांच्या वाहनांसह जप्तीसह त्यांच्या मालमत्तावर आता बोजा चढवला जाणार आहे. वाहन भाडे तत्वावर असलेतरी मूळ मालकावरही कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

27 रोजी मुख्यमंत्री येणार
जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवार, 27 रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. या कार्यक्रमात लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थींची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाला किमान 70 ते 75 हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !