जळगावात दुचाकी चोरट्यांचा टॉप गियर : चोरींचे सत्र थांबेना


Top gear of two-wheeler thieves in Jalgaon : The theft session does not stop जळगाव : शहरातून दुचाकी चोरींचे सत्र थांबायला तयार नाही. शहरासह जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला जात असताना यंत्रणेला चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयश आले आहे.

भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी लांबविली
जळगाव शहरातील भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी चोरीला गेली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर कॉलनीत योगेश भोजू पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवार, 10 जून रोजी रात्री सव्वा सात वाजता योगेश हा भाऊंच्या उद्यानात आला असता त्याने दुचाकी (एम.एच.19 सी.एस.0264) ही उद्यानासमोर उभी केली मात्र आठ वाजता परतल्यानंतर त्याला दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. तपास विजय खैरे करीत आहेत.

गोलाणी मार्केटमधून तरुणाची दुचाकी लांबविली
गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोरून एका तरुणाची दुचाकी चोरीला गेल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हरीष दिलीप खैरनार (30, शिवाजी नगर, जळगाव) हा तरुण पॅथॉलॉजीचे काम करतो. त्याच्याकडे दुचाकी (एम.एच.25 व्ही.1072) क्रमांकाची दुचाकी असून बुधवार, 14 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोर त्याने दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधली. हरीष खैरनार यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !