जामनेर तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण


पहूर : जामनेर तालुक्यातील एकाच गावातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलींना पळवल्याने खळबळ
जामनेर तालुक्यातील एका गावात दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी शेजारी राहतात. गावातील संशयित तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याचा आरोप आहे. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही. अखेर शनिवार, 17 जून रोजी रात्री 10 वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी तुषार अल्लाउद्दीन तडवी याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !