फळ विक्री करणार्या युवकाचा जळगावात पोहताना बुडून मृत्यू
A youth selling fruit drowned while swimming in Jalgaon जळगाव : फळ विक्री करून कुटूंबाला हातभार लावणार्या शहरातील 24 वर्षीय युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलावात रविवारी सायंकाळी घडली. सलमान मो. मुर्शिद बागवान (24, रा.जोशीपेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहेत. तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला.
पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
मो.मुर्शिद हा तरुण जोशीपेठेत आई, वडील, भाऊ, तीन बहिणींसह वास्तव्याला होता शिवाय फळविक्री करून तो परीवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक मुले हे पोहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलावावर येत असल्याने सलमान बागवान हादेखील त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी जलतरण तलावावर आला होता. पोहण्यासाठी तो पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला व काही वेळात ही बाब लक्षात येताच त्यास तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी त्यास मृत घोषित केले.
कुटूंबियांचा आक्रोश मन हेलावणारा
बागवान कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह पाहताच मोठा आक्रोश केला. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती जाणून घेतली.


