लष्कर एक्स्प्रेसमधून मोबाईल लांबवला : जळगावातील आरोपी जाळ्यात
भुसावळ : जळगाव रेल्वे स्थानकावर लष्कर एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना 22 मार्च 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी जळगावातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. तक्रारदार पुष्करसिंह संजीवसिंह तोमर (35, बिण्डवा चंबल, महुआ, मुरेना, मध्यप्रदेश) हे डाऊन 12161 लष्कर एक्स्प्रेसमध्ये जळगाव स्थानकावर चढत असताना अज्ञात आरोपींनी त्यांचा 10 हजारांचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सोमनाथ महादू पाटील (18, शाहु नगर, ट्रॅफिक गार्डन, जळगाव) यास अटक करण्यात आली असून आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रमोद जंजाळकर, हवालदार शैलेंद्र पाटील, जयकुमार कोळी आदींनी केली.
