भुसावळातून अल्पवयीन मुलीचे अपहरण


Abduction of a minor girl from Bhusawal भुसावळ : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील चर्च भागातून सात वर्षीय मुलीचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या पित्याने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताने अल्पवयीनाला पळवले
भोपाळमधील परीवार खेळणी विक्री करून उदरनिर्वाह करतो. हा परीवार शहरात गेल्या काही दिवसांपासून पोटाची खळणी भरण्यासाठी आला असून रेल्वे स्थानकाजवळील चर्च परीसरात या कुटूंबाचा रहिवास आहे मात्र या कुटूंबातील सात वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परीवाराने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !