कुटूंब गावाला, चोरटे दाराला : अमळनेरात धाडसी घरफोडी


Family to the village : thieves to the door : Daring burglary in Amalner अमळनेर : मुलीकडे दाम्पत्य गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 22 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शहरातील ढेकू रोडवरील शास्त्री नगर भागात 18 ते 19 जून दरम्यान घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
शहरातील ढेकू रोडवरील शास्त्री नगर भागातील स्वामी समर्थ रो हाऊसमध्ये हरीचंद्र वाडेकर व प्रमिला वाडेकर हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. दाम्पत्याची मुलगी सुनीता खैरनार या शहरातील मुंदडा नगर भागात असल्याने वाडेकर दाम्पत्य रविवारी त्यांच्या घराला कुलूप लावून मुलीकडे गेले असता चोरट्यांनी संधी साधली. सोमवारी सकाळी सात वाजता हरीचंद्र वाडेकर घरी आल्यानंतर त्यांना घराचा कडी-कोंडा तुटलेला आढळला. चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करीत सात ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, चार ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, एक ग्रॅमचे किल्लू, दिड हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 22 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास एएसआय बापू साळुंखे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !