चोपड्यात साखरपूड्यातून भामट्याने 12 लाखांचे सोने लांबवले


Bhamtya stole 12 lakhs worth of gold from sugarcane in Chopda चोपडा : साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच चोरट्याने तब्बल 12 लाख रुपये किंमतीचे 26 तोळे वजनाचे दागिनेच लांबवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना चोपड्यानजीक अकुलखेडा येथील सौभाग्य लॉनमध्ये घडली. सोमवारी दुपारी 12 ते 1.30 दरम्यान घडली. चोरी प्रकरणी पोलिसांना एकावर संशय असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
चुंचाळे देवेंद्र नारायण चौधरी (53) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी सकाळी साखरपुडा असल्याने वर्‍हाडींची लगबग सुरू असताना त्यांनी दागिणे एका बॅगमध्ये 26 तोळे वजनाचे दागिणे ठेवले होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरपूड्यात मोठी खळबळ उडाली.

अधिकार्‍यांची धाव अन् तपासणी
बॅगेत दोन लाखांचा सोन्याचा नेकलेस, साडेचार लाखांचा व नऊ तोळे वजनाचा मोठा सोन्याचा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या, 50 हजार रुपये किंमतीचे कानातले, 14 हजार रुपये किंमतीच्या साकळ्या, सात हजारांचा चांदीचा छल्ला असा एकूण 11 लाख 71 हजारांचा ऐवज होता. बॅग चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी कृषिकेश रावळे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी देवेंद्र नारायण चौधरी (53, चुंचाळे, ता.चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !