पालकमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रु नुकसानीचा खटला : आमदार एकनाथ खडसे म्हणाले की…!


जळगाव : तत्कालीन युती सरकारमध्ये एकनाथ खडसे हे कृषि मंत्री व बारा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी मत्रिीपदाचा गैरवापर करून स्वतःच्या शेतावर 40 लाखांचे पॉलिहाऊस त्याचप्रमाणे त्यांच्या मुक्ताईनगर सूतगिरणीसाठी सरकारकडून दीडशे कोटी लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर आमदार खडसे यांनी या संदर्भात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाल्या. या दाव्या संदर्भात आमदार खडसे यांनी मोठे विधान केले असून गुलाबरावांनी माफी मागितल्यास आपण दाखल केलेला खटला मागे घेणार असल्याचे सांगितले आहे.

न्यायालयात कागदपत्रे केली सादर
विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये केलेल्या वक्तव्याविरोधात, खडसे यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी खडसे सोमवारी न्यायालयात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. खडसेंनी पुरावे म्हणून काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली असून न्यायालयात शपथपत्रदेखील सादर केले. या खटल्याबाबत मागील आदेश तसेच ठेवून गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा खटला पुढे सुरू ठेवावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली.

आज पुन्हा सुनावणी
गुलाबराव पाटील यांचे नाव सोमवारी दोन वेळा न्यायालयाने पुकारले मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीही कोर्टात हजर झाले नाही. या खटल्याची मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !