कोळन्हावी येथे झोपलेल्या वयोवृद्धेच्या गळ्यातून धूम स्टाईल पोत लांबवली


A dhoom style texture extends from the neck of a sleeping elderly man at Kolnhavi यावल : यावल तालुक्यातील कोळन्हावी अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबवली. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीच्या घटनेत गावात खळबळ
लिलाबाई बुधा साळुंखे (70, कोळन्हावी, ता.यावल) या वृद्धा महिला पती, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे सोमवार, 19 जून रोजी रात्री 9.30 वाजता त्या जेवण करून अंगणात खाटेवर झोपल्या असता त्यांच्या बाजूला त्यांचे पती देखील दुसर्‍या खाटेवर झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरीने तोडून धूमस्टाईल पोबारा केला. वृद्धेने आरडाओरड केली परंतु तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. या संदर्भात महिलेने मंगळवार, 20 जून रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !