पिंप्री शिवारात तापी नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई


यावल : तालुक्यातील पिंप्री येथे तापी नदीच्या काठावर अवैध गावठी दारू हातभट्टीद्वारे गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत कच्चे पक्के रासायन, गावठी दारू मुद्देमाल हस्तगत केला. काही साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ
पिंप्री, ता.यावल शिवारातील तापी नदीच्या काठावर विशाल उर्फ आकाश निवृत्ती सपकाळे हा गावठी हातभट्टीची दारू गाळण करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, विनोद चौधरी यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला व विशाल उर्फ आकाश सपकाळे यांच्याकडून कच्चे पक्के रसायन, गावठी दारू असा नऊ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. काही मुद्देमाल त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !