ओझरखेड्यातील प्रौढाची विष प्राशन करीत आत्महत्या
An adult in Ozarkheda committed suicide by consuming poison भुसावळ : तालुक्यातील ओझरखेडा येथील 45 वर्षीय प्रौढाने काहीतरी विषारी द्रव सेवन करीत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. संदीप त्र्यंबक नेमाडे (45, ओझरखेडा, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

