अंजाळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला


The body of unknown Isma was found in Anjale Shivar यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावानजीकच्या शिवारात सुमारे 40 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळला आहे. मयत हा गेल्या दोन दिवसांपासून या भागात फिरत असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, यावल निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

मयताची ओळख पटवण्याचे आवाहन
अंजाळे गाव-शिवारातील शिकलादेवी मंदिराजवळील डाव्या बाजुस असलेल्या चारीमध्ये अनोळखीचा मृतदेह पडून असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये हलवला. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे. मयताबाबत काही माहिती असल्यास यावल पोलीस ठाण्याच्या 02585-261333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !