मंगरूळ शिवारातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
रावेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारातून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना बुधवार, 14 रोजी दुपारी 12 वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरण रामदास पाटील (45, लोणी, ता.बर्हाणपूर) यांनी आपली दुचाकी (एम.पी.12 एम.जी.6584) ही 14 रोजी मंगरूळ शिवारातील मनोज युवराज पाटील यांच्या शेतात लावली होती मात्र चोरट्यानीं संधी साधून दुचाकी लांबवली. तपास नाईक सुनील वंजारी करीत आहेत.