नव मतदार नोंदणीसाठी बीएलओ यांना राजकीय पक्ष प्रमुखांनी सहकार्य करावे

नूतन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचे बैठकीत आवाहन


भुसावळ : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकवार आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात नव मतदार नोंदणी, पत्ता बदल झालेल्यांचा पत्ता बदल करणे, मृत मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळणे यासाठी आपल्या प्रभागात येणार्‍या बीएलओ यांना राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकार्‍यांनी सहकार्य करावे, राष्ट्रीय कामास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले.

प्रांत कार्यालयात बैठक
प्रांत कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या बैठक झाली. यावेळी प्रांत पाटील यांनी राजकीय पक्षाच्या प्रमुखांना माहिती देतांना सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर केला आहे.

असे आहे कार्यक्रमाचे स्वरूप
हा कार्यक्रम 1 जूनपासून सुरू झाला आहे. यात 1 जून ते 20 जुलै या काळात मतदार नोंदणी अधिकार, सहायक मतदार नोदणी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची मतदार नोंदणी बाबत कायदे व मार्गदर्शक सूचना तसेच अद्यावत अ‍ॅप व प्रणालीच्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजीत करणे, 21 जुलैला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी यांच्याकडून घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे हा कार्यक्रम 21 ऑगस्टपर्यत चालणार आहे. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेबर या काळात मतदान केद्रांचे, सुसूत्रीकरण, तर्कशुध्दकरण, पुनर्रचना, मतदार यादीतील तफावत दूर करणे, खराब छायाचित्रे बदल करणे, मतदान केंद्राच्या यादीला मंजुरी मिळविणे तसेच 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर या काळात 2 ते 8 नमूना तयार करणे, एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे, 17 ऑक्टोबरला एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, 17 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, 26 डिसेंबरला दावे व हरकती निकाली काढणे, 1 जानेवारी 2024 अंतीम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डेटाबेसचे अद्यावतीकरण व पुरवणी याद्यांची छपाई करणे, 5 जानेवारी 2024 अंतीम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. या बैठकीला निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर, नायब तहसीलदार प्रीती लूटे, शाम गिरी तसेच रीपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, प्रकाश कोळी (खन्ना), मुनवर खान, हमीद शेख, रवींद्र निकम, विनायक शिवरामे, दीपक मराठे, दीपक धांडे, निखील सपकाळे, शेख अकबर, समीर शेख, राजेश सोनवणे, भालचंद्र पाटील, राजू इंगळे, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !