भुसावळात शिवसेनेतर्फे (उबाठा गट) महिलांसाठी योजनांचे शिबिर


भुसावळ : शिवसेना (उबाठा गट) वर्धापनादिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने जुना सातारा भागातील शिवसेना कार्यालयात महिलांसाठी शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुकन्या समृध्दी योजनेविषयी सविस्तर माहिती देवून अनेकांचे खाते उघडण्यात आले तर महिला सन्मान योजनेविषयी जनजागृती करून त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रसंगी शैक्षणिक कामासाठी आपली कागदपत्रे यावेळी दिली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यशस्वीतेसाठी शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, राकेश खरारे, स्वप्नील सावळे, नरेंद्र लोखंडे, संदीप पाटील, गोकुळ बाविस्कर, सोनी ठाकूर, दिलीप सुरवाडे व शिवसैनिकांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !